आम्ही आहोत..
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम असून, हवामान विभागाने मंगळवारीही अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबईसोबतच ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांमध्येही मुसळधार पाऊस कोसळणार आहे.
मुंबईत सोमवारी दिवसभर मुसळधार पाऊस कोसळत होता. मंगळवारीही त्याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. शहर, तसेच उपनगरात सोमवारी मध्यरात्री पावसाचा जोर कायम होता. पहाटेपासून पुन्हा पावसाने दमदार हजेरी लावली आहे. अंधेरी, बोरिवली, वांद्रे, शीव, घाटकोपर, दादर, भायखळा, वरळी या परिसरात संततधार पाऊस पडत आहे. त्यामुळे पावसाचा अंदाज घेऊन घराबाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील २४ तासांत मुंबई आणि उपनगरांत काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात पाऊस सर्वच जिल्ह्यात अधिक मोठ्या प्रमाणात आहे. शिव आरोग्य सेना या काळात आपणास आरोग्य सुविधा देण्यास कायम तत्पर आहे. कोणत्याही समस्येला घाबरू नका. लगेच संपर्क करा.
– डॉ. किशोर ठाणेकर, कार्याध्यक्ष – शिव आरोग्य सेना, शिवसेना महाराष्ट्र राज्य